बोगोटा : इक्वाडोरमध्ये एका ट्रान्सजेंडर (लिंग परीवर्तन केलेला) जोडीतील एका पुरुषाने गर्भ धारणा केल्याने नवा इतिहास झालाय. फर्नांडो मचाडो आणि डायने रोड्रिगेज यांनी सोशल मीडियावर प्रेग्नंट असल्याची माहिती दिलेय.
असे सांगितले जात आहे की, हा दक्षिण अमेरिकेतील देश आहे. या देशात असे प्रकरण पहिल्यांदाच घडत आहे. या वृत्ताने अनेक लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
...त्यामुळे जगाला कळविले कारण
डायने इक्वाडोरमध्ये एक एलजीबीटी समुदायाचा एक प्रमुख कार्यकर्ता आहे. डायने सांगितले, मी व्हेनेजुएलात जन्मलेलो आहे. जोडीदाराची गर्भधारण झाल्याने सार्वजनिक केले, कारण रोम कॅथोलिक समाजात याकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलेल. डायने सांगितले, आम्ही ट्रान्सजेंडरों असलो तरी आमच्या अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न केला. जे काही गैरसमज होते ते दूर होणे आवश्यक आहेत.