www.24taas.com, झी मीडिया, सिंगापूर
परदेशात वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दोघा भारतीयांना सिंगापूर पोलिसांनी अटक केलीय. वेश्या व्यवसाय करण्यासंबधीच्या गुन्ह्याबद्दल भारतीय जुळ्या भावंडांना साडेतीन महिन्यांची कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
द स्ट्रेट्स टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार रमन आणि लक्ष्मणन सेल्वाराज (२६) यांना मंगळवारी ही शिक्षा ठोठावण्यात आली. परंतु या सुनावणीनंतर मात्र दोघं एकदम स्तब्ध झाले. तीन जूनला त्यांनी अपराध मान्य केल्यानंतर त्यांना वाटले की, शिक्षेच्या रूपात फक्त दंड भरावा लागेल. परंतु तसे काही झालेले नाही.
लक्ष्मण हा गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये सिंगापूरमध्ये आला होता. तिथे त्याची भेट देहविक्री व्यवसाय करणाऱ्या बालामुरूगन सेल्वम पनीर याच्याशी ओळख झाली. तो भारतातून येणाऱ्या महिलांचा देहविक्री व्यवसाय करायचा. त्यानंतर लक्ष्मणने त्याला या देहविक्री व्यवसायात साथ देण्यास सुरुवात केली आणि तो वेश्यांकडून झालेल्या कमाईची रक्कम जमा करू लागला.
ही कमाई तो बालामुरुगन याच्याकडे देत असे. यातील संपूर्ण खर्च बाजूला काढून बाकी रक्कम तो भारतातील टोळीला पाठवत असे. गेल्यावर्षी १७ डिसेंबरला पोलिसांनी टाकलेल्या धाडीत या दोन जुळ्या भावाना आणि त्यांच्या अन्य तीन सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. कशीदरम्यान असे समजले की, ही लोक गेल्या सहा महिन्यामपासून हा व्यवसाय करत आहेत. फ्रेब्रुवारीमध्ये बालामुरुगनला पाच महिन्यामची कोठडी झाली होती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.