दोन विमानांची हवेत धडक, दोन्ही समुद्रात कोसळली

लॉस एंजेलिस : अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे शुक्रवारी दुपारी दोन विमानांची हवेत टक्कर झाली. 

Updated: Feb 6, 2016, 11:04 AM IST
दोन विमानांची हवेत धडक, दोन्ही समुद्रात कोसळली title=

लॉस एंजेलिस : अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे शुक्रवारी दुपारी दोन विमानांची हवेत टक्कर झाली. त्यानंतर ही दोन्ही विमाने समुद्रात कोसळली.

असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेच्या एका वृत्तानुसार स्थानिक वेळेनुसार दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. लॉस एंजेलिस बंदरापासून साधारण साडेतीन किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला, अशी माहिती अमेरिकी कोस्ट गार्डने दिली आहे.

या विमानांमध्ये किती प्रवासी होते, याची अद्याप माहिती मिळालेली नाही. त्याचसोबत किती जीवितहानी झाली याबद्दलही काही माहिती मिळू शकलेली नाही. सूर्यास्ताची वेळ जवळ आली त्यावेळी पाणबुड्यांना पाचारण करण्यात आले आणि शोधकार्य सुरू केले गेले. यादरम्यान नौकांची वाहतूकही बंद ठेवण्यात आली.

विमानांचा काही शोध लागलेला नसला तरी विमानांचे काही भाग मात्र सापडले आहेत. ही विमाने समुद्राच्या तळाशी जाऊन रुतल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.