कीव : युक्रेनमध्ये सध्या विचित्र ऑफर सुरू आहे. खरेदी वाढविण्यासाठी युक्रेनची राजधानी कीव येथे बिकीनी परिधान करून आल्यावर ग्राहकांना फुकट म्हणजे मोफत पेट्रोल दिले जात आहे. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात या गॅस स्टेशनवर तरूण-तरूणी बिकनी घालून गर्दी करीत आहे.
मीडियात आलेल्या बातम्यांनुसार तरूणीसह काही पुरूषही मागे नाही. काही पुरूष बिकीनी घालून पेट्रोल पंपावर येत आहेत आणि या ऑफरचा फायदा घेत आहेत. या ऑफरच्या जाहिरातीत असे म्हटले नव्हते की ही ऑफर केवळ महिलांसाठीच आहे. ही ऑफर २६ सप्टेंबरला सुरू झाली होती.
विशेष म्हणजे क्रिमियातील वादानंतर युक्रेनच्या अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसला आहे. त्यामुळे अशा प्रकारची ऑफर आल्याने तेथील लोक खूप उत्साहित आहेत. मोठ्या प्रमाणात लोक या ऑफरचा लाभ घेण्यासाठी पेट्रोलपंपावर गर्दी करीत आहेत.
पाहा हा व्हिडिओ..
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.