www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
अमेरिकेच्या ‘प्रिज्म’ या हेरगिरीची प्रकल्पाचा भंडाफोड करणाऱ्या एडवर्ड स्नोडेननं कॉम्प्युटर हँकिंगचं तंत्रशुद्ध ज्ञान नवी दिल्लीतच घेतलंय. दिल्लीच्या कोइंग सोल्यूशन या इन्स्टिट्यूटमधून स्नोडेननं हे शिक्षण घेतलंय. या इन्स्टिट्यूटनंच ही माहिती प्रसिद्ध केलीय.
स्नोडेन ३ सप्टेंबरला २००९ साली हा कोर्स करण्यासाठी भारतात आला होता. एक आठवडा तो भारतात होता. त्यावेळी कोइंग सोल्यूशनमध्ये कोर जावा प्रोग्रॅमिंग आणि अॅडव्हान्स एथिकल हॅकिंग या कोर्ससाठी त्यानं प्रवेश घेतला होता. यासाठी त्यानं २००० डॉलर्स इतकी फी सुद्धा भरली होती.
आठवडाभराच्या या कोर्सनंतर त्याला इसी-कॉन्सिल सर्टिफाईड सिक्युरिटी अॅनॅलिसिस्टचं सर्टिफिकेटही देण्यात आलं. त्यानंतर ९ सप्टेंबर २००९ला तो अमेरिकेत परतला . कोइंग सोल्यूशनचे संस्थापक रोहित अग्रवाल यांनी ही माहिती दिली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.