थरारक व्हिडिओ: १६४ जिगरबाज स्काय डायव्हर्सचा विक्रम!

स्काय डायव्हिंग एक थरारक अनुभव असतो. पण खाली डोके आणि वर पाय अशा परिस्थितीत २४० किमी वेगानं पृथ्वीकडे येतांना १९,७०० मीटर उंचीवर फुलासारखी आकृती तयार करण्याचं दमदार कर्तब १६४ स्काय डायव्हर्सनी केलाय. 

Updated: Aug 2, 2015, 10:30 AM IST
थरारक व्हिडिओ: १६४ जिगरबाज स्काय डायव्हर्सचा विक्रम! title=

ओटावा: स्काय डायव्हिंग एक थरारक अनुभव असतो. पण खाली डोके आणि वर पाय अशा परिस्थितीत २४० किमी वेगानं पृथ्वीकडे येतांना १९,७०० मीटर उंचीवर फुलासारखी आकृती तयार करण्याचं दमदार कर्तब १६४ स्काय डायव्हर्सनी केलाय. 

स्काय डायव्हिंगचा हा नवा जागतिक विक्रम आहे. शुक्रवारी मध्य इलिनॉय राज्याच्या आकाशात हा विक्रम नोंदविण्यात आला. या विक्रमी चमूतील स्काय डायव्हर्स स्पेन, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेच्या विविध राज्यांमधील प्रशिक्षण केंद्रातील होते. १३ व्या प्रयत्नांत त्यांना हे यश मिळालं. त्यांनी सन २०१२ मध्ये १३८ स्कायडायव्हर्सनी केलेला विक्रम मोडला.

एकूण सात विमानांमधून या १६४ जणांनी भरारी घेतली. स्काय डायव्हर्सना सुयोग्य ठिकाणी, सुयोग्य वेळेला आणि सुयोग्य उंचीवर आकाशात उडी घेता यावी यासाठी ही विमानं अचूक वेगानं आणि दिशेनं उडत गेली. ठरलेल्या अचूक वेळी या सर्व १६४ जणांनी आपापल्या विमानांमधून आकाशात उड्या घेतल्या आणि ओटावाच्या ग्रामीण 'ड्रॉप झोन'च्या वर आकाशात १९,७०० फूट उंचीवर असताना सर्वांनी काही क्षणांसाठी एका महाकाय फुलाच्या आकाराचा आकृतिबंध तयार केला. त्यानंतर हे सर्व स्काय डायव्हर्स विखुरले गेले आणि पॅराशूट उघडून कालांतरानं अलगदपणे जमिनीवर पोहोचले तेव्हा आनंदानं प्रेक्षकांनी त्यांचं उत्स्फूर्त स्वागत केलं.

विशेष म्हणजे या विक्रमवीरांएवढेच तरबेज व्हिडिओग्राफरनं स्काय डायव्हिंग करत त्यांच्या दोन्ही बाजूंना, वर आणि खाली राहून या थरारक क्षणांचं व्हिडिओ शूटिंग केलं. 

पाहा हा थरारक व्हिडिओ -

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.