लंडन : मी माझ्याशी लग्न केलं. चांगली व्यक्ती शोधण्यासाठी वर्ष लागू शकतात. मला ते करायचं नव्हते. मी माझ्याशी लग्न करण्यासाची संकल्पा आखत होती. त्यानुसार मी स्वत:शीच लग्न केले. आधी एकटे असल्याचे वाटत होते. आता मी एकटी नाही, अशी प्रतिक्रिया स्वत:शीच लग्न केल्यानंतर ग्रेस गेल्डर हिने दिलेय.
ब्रिटनमध्ये वर्हाडी. वाजंत्री. मंडपही सजलेला. मात्र, वरा ऐवजी हजर होती केवळ वधू. ब्रिटनमधील ग्रेस गेल्डर या तरुणीने स्वत:शीच लग्न केले. ग्रेस गेल्डर व्यवसायाने एक फोटोग्राफर आहे. गेल्या सहा वर्षांपासून आपण एकटीच राहत असून यादरम्यान आपले स्वत:वरच प्रेम झाले आणि आपणच आपल्याला‘प्रपोज’ केले आणि आज हा लग्नसोहळा होत असल्याचे तिने सांगितले.
तिच्या या अनोख्या विवाह सोहळ्याला तिच्या बहिणी, सर्व मित्रमंडळीही आवर्जुन उपस्थित होती. मात्र, तिच्या या लग्नाला कायद्याची संमती नसली तरी आता आपण ‘एकटी’नाही याचा आनंदच आपल्यासाठी खूप मोठा आहे, असे ग्रेसने सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.