नवी दिल्ली : उरी हल्ल्यानंतर जगातील समुदायाने भारताचे समर्थन केले आहे. संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान की-मून यांनी हल्ला करणाऱ्यांना न्यायाच्या चौकटीत आणण्यात येईल असे म्हटले आहे. उरी हल्ल्यात १८ जवान शहीद झाले.
पाकिस्तानच्या संशयीत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेद्वारे हल्ला करण्यात आला. याविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर संताप व्यक्त करण्यात आला. फ्रान्स आणि कॅनडाने या हल्लाचा निषेध व्यक्त केला आणि दहशतवादाविरोधात साथ देण्याची तयारीही दर्शविली आहे. फ्रान्सने काश्मीर मुद्दा शांततेने सोडविण्याची सूचना केली आहे.