www.24taas.com, टोकयो
जगातील सर्वात म्हाताऱ्या महिलेचं निधन झाल्याची बातमी जपानच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आली आहे. जपानमधील कोतो ओकुबो या ११५ वर्षांच्या आजीबाई जगातील सर्वांत वृद्ध महिला होत्या.
कोतो ओकुबो यांचं काल जपानची राजधानी असलेल्या ओकुबोजवळील कावासाकी सिटीमध्ये निधन झालं. स्थानिय प्रशासकीय अधिकारी मित्शुरो कोजुका यांनी सांगितलं की ओबुकोंच्या कुटुंबाने निधनाचं कारण सांगण्यास नकार दिला आहे.
कोतो ओबुको यांचा जन्म २४ डिसेंबर १८९७ साली झाला होता. एक शतकाहूनही अधिक काळ कोता ओबुकी यांनी पाहिला आहे. अमेरिकेतील दीना मॅनफ्रेडिनी या जगातील सर्वांत वयोवृद्ध महिला ठरल्या होत्या. परंतु, त्यांच्या मृत्यूनंतर जगातील सर्वांत जास्त वय असलेल्या जिवंत महिला हा किताब कोता ओबुको यांना देण्यात आला होता.