जगातील सर्वात शाही आणि तेवढाच महागडा विवाह

मुंबई : सध्या प्रचंड आर्थिक संकटातून जाणाऱ्या कझाकिस्तानात पार पडलेले एक लग्न जगातील सर्वात महागडे ठरलेय. 

Updated: Mar 31, 2016, 11:24 AM IST
जगातील सर्वात शाही आणि तेवढाच महागडा विवाह title=

मुंबई : सध्या प्रचंड आर्थिक संकटातून जाणाऱ्या कझाकिस्तानात पार पडलेले एक लग्न जगातील सर्वात महागडे ठरलेय. येथील एका खनिज तेलसम्राटने आपल्या मुलाच्या लग्नावर तब्बल ६,६०० कोटी रुपये खर्च केल्याची चर्चा केली जात आहे. या लग्नाचा थाट शाही होता.

करोडपतील उद्योगपती मिखाइल गुस्तेरीवचा मुलगा सइदने खादिजा उजहाखोवाशी लग्न केले. रशियाची राजधानी मॉस्को येथे २६ मार्च रोजी हा विवाहसोहळा पार पडला. गुस्तेरीव हे कझाकिस्तानातील खनिज तेल सम्राच आहेत. कझाकिस्तानातील सर्वात मोठ्या खनिज तेल आणि मीडिया कंपनीचे ते मालक आहेत. त्यांची संपत्ती ६.३ अब्ज डॉलर्स आहे.

 

सइद याचे वय २८ वर्षे आहे. त्याचं शिक्षण प्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापीठात झालं आहे. सध्या तो वडिलांचा उद्योग संभाळतोय. तर खदिजा सध्या २० वर्षांची आहे. मॉस्को विद्यापीठात ती वैद्यकीय शिक्षण घेतेय. त्यांच्या विवाह सोहळ्यासाठी तिने पॅरिसहून १६ लाख रुपयांचा गाऊन खरेदी केला होता.

 

 

 

खास करुन लग्नसमारंभाच्या कार्यक्रमात गाण्यासाठी हॉलिवूडचे प्रसिद्ध गायक जेनिफर लोपेझ आणि एनरिक आले होते. लग्न सोहळ्याच्या ठिकाणाबाहेर रोल्स रॉईससारख्या अतिमहाग दर्जाच्या शेकडो गाड्या होत्या. तर ६०० पाहुण्यांच्या खास जेवणासाठी युरोपीयन पदार्थ होते.