जगातील सर्वात 'लकी महिला प्रवासी'

ही चीनची महिला जगातील सर्वात लकी महिला प्रवासी म्हटली जात आहे. चीनच्या नवीन वर्षाला आठ फेब्रुवारी रोजी सुरूवात होत आहे. 

Updated: Feb 4, 2016, 10:16 PM IST
जगातील सर्वात 'लकी महिला प्रवासी' title=

बीजिंग : ही चीनची महिला जगातील सर्वात लकी महिला प्रवासी म्हटली जात आहे. चीनच्या नवीन वर्षाला आठ फेब्रुवारी रोजी सुरूवात होत आहे. 

या दिवशी चीनचे सर्व नागरीक देश परदेशातून आप-आपल्या घरी परतता, तेव्हा गणपतीच्या वेळी कोकणात जाण्यासाठी आणि दिवाळीला महाराष्ट्रात घरी परतणाऱ्यांची जशी गर्दी होती, त्यापेक्षाही खच्चून गर्दी ही चीनमध्ये परतण्यासाठी होती. 

चीनच्या ग्वांगजो एअरपोर्टवर दीड लाखाच्या आसपास लोक सहा-सहा तास विमानाची प्रतिक्षा करतात. या अडकून पडलेल्या प्रवाशांना कधी फ्लाईट मिळेल आणि कधी नाही, यावरून ते वैतागलेले असतात.

 ही चीनची महिला झांगही अशाच एका विमानात होती, पण त्या फ्लाईटला उशीर होणार होता, म्हणून प्रवाशांनी ती फ्लाईट टाळली मात्र, झांग शांतपणे बसून होती. 

अचानक अडचण दूर झाली आणि या विमानाने एकट्या झांगला आणि क्रू मेंबर्सला घेऊन भरारी घेतली. जणू काय झांगसाठीच हे खास विमान सोडण्यात आलं होतं. 

झांगला रॉयल प्रवासाचा आणि ट्रिटमेंटचा दुर्मिळ अनुभव येत होता, याचे फोटो तिने आपल्या ब्लॉगवर शेअर केल्यानंतर ते व्हायरल झाले, अनेकांनी तिला लकी म्हटलंय, तर अनेकांनी इंधनाची उधळपट्टी म्हटलंय. झांगला तिच्या घरी ग्वांगजोला जायचं होतं. आणि ती आरामाचा प्रवास करत घरी पोहोचली.