अंटार्टिका: संशोधकांनी जगातील सर्वात जुन्या शुक्राणूंचा जीवाश्म शोधलाय. रॉयल सोसायटी बायोलॉजी लेटर्समध्ये छापून आलेल्या अहवालानुसार अंटार्टिकाच्या सुदूर भागामध्ये सापडलेला हा जीवाश्म ५ कोटी वर्षांपूर्वीचा असून तो क्लायटेलाटा (शिंपल्या सारखा प्राणी) च्या शरीरात सापडलाय.
शुक्राणू उलगडणार अनेक रहस्य
संशोधकांनी हा शुक्राणू सापडणं म्हणजे अॅक्सिडेंटल डिस्कव्हरी म्हटलंय. संशोधकांची टीम ककूनचं स्ट्रक्चर समजून घेण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा त्यांची दृष्टी स्पर्मच्या जीवाश्मवर गेली. जो की ककूनच्या आत होता. वैज्ञानिकांचा दावा आहे की, कदाचित हा सर्वात जुना स्पर्म आहे. जो कृमीच्या उत्पत्ती आणि जीवनाच्या विकासाचे अनेक रहस्य उलगडू शकेल. एका भितींच्या फटीत ही कृमी संशोधकांना आढळली.
डीएनए काढता येणार नाही
पॅलिओबॉटनिस्ट बेंजामिन यांनी सांगितलं की, जरी जीवाश्म खूप चांगल्या पद्धतीनं सुरक्षित अवस्थेत मिळालाय. तरीही फिल्म 'जुरासिक पार्क' सारखा त्यातील डीएनए काढता येणार नाही. कारण आता त्यात कोणताही ऑर्गेनिक मटेरिअल नाहीय. ककूनच्या आत स्पर्म सोबत अंडे सुद्धा मिळाले आहेत. ज्याची इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपिक आणि स्कॅनिग तंत्राच्या साहाय्यानं शोधलं गेलं. कार्बन एजिंगद्वारे हे कळतंय की, जीवाश्म जवळपास ५ कोटी वर्ष जुना आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.