बिजींग : चीन सैन्याने भारतीय हद्दीत घुसखोरी केली असताना भारताने तीव्र निषेध केला. ही घुसखोरी मागे घेण्याऐवजी चीनने आपल्या सैनिकांना युद्धास तयार राहावे आणि आदेशाचे सक्तीने पालन करावे, असे आदेश चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिलेत.
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) भारतीय हद्दीत घुसखोरी करत सात तंबू उभारले आहे. या घुसखोरीनंतर दुसऱ्याच दिवशी शी जिनपिंग यांनी चिनी सैन्याला प्रादेशिक युद्धासाठी सज्ज राहण्यास सांगितलेय. भारताच्या तीन दिवशी दौऱ्यानंतर त्यांनी पीएलएच्या सैनिकांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी प्रादेशिक युद्धासाठी तयार राहण्याचे सैन्याला सांगितले.
पीएलएच्या सैनिकांचा चीनच्या कम्युनिस्ट पक्ष आणि आपल्या मुख्यालयावर निष्ठा आणि विश्वास असणे आवश्यक आहे. पीएलएने आपल्या मुख्यालयांमध्ये सुधारणा करून प्रादेशिक युद्द जिंकण्यासाठी तयार राहावे, असे जिनपिंग म्हणालेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.