युट्युबने हा व्हिडिओ प्रसिद्ध केला आणि २.६४ कोटींचा बसला भुर्दंड

यूट्युबला खासगी कार्यक्रमाचा व्हिडिओ प्रसिद्ध करणे चांगलेच महागात पडले आहे. यूट्युबला तब्बल २ कोटी ६४ लाखांची तोडपाणी करावी लागली.

Reuters | Updated: Aug 28, 2015, 06:23 PM IST
युट्युबने हा व्हिडिओ प्रसिद्ध केला आणि २.६४ कोटींचा बसला  भुर्दंड title=

वॉशिंग्टन : यूट्युबला खासगी कार्यक्रमाचा व्हिडिओ प्रसिद्ध करणे चांगलेच महागात पडले आहे. यूट्युबला तब्बल २ कोटी ६४ लाखांची तोडपाणी करावी लागली.

त्याचं असं झालं, अमेरिकन मॉडेल किम कार्दशियन हिच्या एका खासगी कार्यक्रमाचा व्हिडिओ यूट्युबवर प्रसिद्ध करण्यात आला होता. याबाबत किमने नाराजी व्यक्त करत नुकसान भरपाईची मागणी केली होती.

किम कार्दशियन ही सोशल मीडियात लोकप्रिय आहे. ती अमेरिकन टेलिव्हिजनवरील मॉडेल आहे. या किमच्या लग्नाच्या मागणीचा खासगी व्हिडिओ यूट्युबवर प्रसिद्ध झाला होता. किमला २०१३ रोजी एका खासगी कार्यक्रमात गायक काने वेस्ट याने तिच्या कुटुंबियांसह, मित्रपरिवारांसमोर तिला लग्नाची मागणी केली होती. याच कार्यक्रमाचे गुपचूप चित्रिकरण करण्यात आले होते. किमने २०१४ मध्ये गायक काने वेस्टसोबत विवाह केला.  

या व्हिडिओबाबत किम आणि कानेने नाराजी व्यक्त करत यूट्युबविरुद्ध नुकसानभरपाईचा दावा दाखल केला होता. याप्रकरणी यूट्युबने तडजोडीची रक्कम म्हणून ही रक्कम देण्याचे कबूल केलेय.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.