www.24taas.com, लंडन
इंटरनेटवर ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांची संख्या चिक्कार आहे. पण न्यू जर्सी मधल्या एका ऑटो डीलरला विंटेज कार विकत घेताना आश्चर्याचा धक्का बसला.
न्यू जर्सीमधील जेनोप टुन्सर हा ऑटो डीलर जुन्या विंटेज गाड्यांच्या खरेदीसाठी ऑनलाइन शॉपिंग करत होता. त्यात त्याला एक मर्सिडिजची गाडी पसंत पडली. जेनोप एका जुम्या कारचं मोडीफिकेशन करत होता. त्यासाठी त्याला गाडीच्या एका पार्टची आवश्यकता होती. विंटेज कारचा हा एक पार्ट मिळवण्यासाठी त्याने इंटरनेटवर ऑनलाइन शॉपिंग केली. त्यानंतर मर्सिडिझच्या ऑफिसमध्ये त्याने कॉल करून आपल्याला हव्या असलेल्या गाडीचा सिरीयल नंबर सांगितला, तेव्हा त्याला उत्तर मिळालं की ‘ही तर अडॉल्फ हिटलरची कार आहे’.
मर्सिडिजने दिलेल्या माहितीनुसार ही कार अस्सल असून नाझी अधिकाऱ्यांसाठी बलवण्यात आलेल्या ८ गाड्यांपैकी १ आहे. १९४२ साली मर्सिडिज ३२० कॅब्रियोलेट डी कार ही गाडी दुसऱ्या महायुद्धात नाझीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांसाठी बनवली गेली होती. ही गाडी कदाचित हिटलरच्या एखाद्या जनरलची असावी.