www.24taas.com, सिडनी
ऑस्ट्रेलियात जवळपास ३५० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या जहाजाला जलसमाधी मिळाल्याची भिती वर्तविण्यात आली आहे. या वृत्ताला ऑस्टेलियाचे पंतप्रधान जुलिया गिलर्ड यांनी दुजोला दिला आहे. ही घटना पपुआ नवी गुईनी येथे घडली.
जहाजाला जलसमाधी मिळाल्याचे वृत्त ऑस्ट्रेलियातील एका वृत्त वाहिनीने दिले आहे की, जहाज सापडले असून चार जहाजे आणि दोन हेलिकॉप्टरच्या साहाय्याने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, जहाज बुडाल्याची माहिती ऑस्टेलियाचे पंतप्रधान जुलिया गिलर्ड यांनी दिली दिली आहे.
जहाजाला जलसमाधी मिळाल्याचे वृत्त समजताच ऑस्ट्रेलियाशेजारील देशही मदतीला धावून आले असल्याचे गिलर्ड यांनी सांगितले. आमच्याकडील यादीनुसार जहाजेवर जवळपास ३५० प्रवासी होते. ही मोठी दुर्घटना आहे, असेही ते म्हणाले.