जहाजाच्या अपघातात १३० भारतीय बचावले

इटलीच्या तस्कान किनाऱ्यावर जहाज दगडावर आदळल्यानं मोठा अपघात झाला आहे. यात दोन फ्रेंच प्रवासी आणि एका पेरुच्या क्रू मेंबरचा भितीनं समुद्रात उडी टाकल्यानं मृत्यू झाला आहे. या जहाजात १३० भारतीय प्रवाशांसह ४ हजार दोनशे प्रवासी होते.

Updated: Jan 16, 2012, 12:56 PM IST

www.24taas.com, इटली

 

इटलीच्या तस्कान किनाऱ्यावर जहाज दगडावर आदळल्यानं मोठा अपघात झाला आहे. यात दोन फ्रेंच प्रवासी आणि एका पेरुच्या क्रू मेंबरचा भितीनं समुद्रात उडी टाकल्यानं मृत्यू झाला आहे.  या जहाजात १३० भारतीय प्रवाशांसह ४ हजार दोनशे प्रवासी होते. यातल्या सर्व भारतीयांना वाचवण्यात यश आलं असून त्यांना सुखरूप स्थळी पोहचवण्यात कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे.

 

तर इतर ६०० प्रवाशांना वाचवण्यात यश आल्याचं सांगण्यात येत आहे. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास गिगिलियो इथं हा अपघात घडला. या अपघातानंतर बचावकार्य तातडीनं सुरु करण्यात आलं. दरम्यान, अपघातग्रस्त भारतीयांना तातडीची मदत उपलब्ध करण्याचे आदेश परराष्ट्रमंत्री एस.एम.कृष्णा यांनी इटलीतल्या भारतीय राजदूतांना दिले आहेत.

 

बचावकार्य सुरु असताना जहाजाचा ब्लॅक बॉक्स सापडलाय. या ब्लॅक बॉक्समधून जहाजावरील क्रू मेंबरचं अपघाताआधीचं संभाषण समोर येण्याची शक्यता आहे.