तिबेट खिंडीसाठी चीनचा लष्करी सराव

चीनने आता तब्बल पाच हजार मीटर उंचीवरील तिबेटच्या खिंडी ताब्यात घेण्याचा लष्करी सराव केला.

Updated: Nov 20, 2011, 05:01 AM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

 

 

चीनने आता तब्बल पाच हजार मीटर उंचीवरील तिबेटच्या खिंडी ताब्यात घेण्याचा लष्करी सराव केला. तिबेटमधील पहिल्या लष्करी सरावाला एक वर्ष पूर्ण होत असतानाच चीनने हा लष्करी सराव केला.

 

 

तिबेटच्या स्वातंत्र्याला अमेरिकेसह अनेक पाश्चात्य देशांची पाठिंबा आहे तसेच भारताने दलाई लामा यांना आश्रयही दिला आहे. मात्र आता चीनच्या वाढत्या वर्चस्वाला लगाम घालण्याचे संकेत अमेरिकेने दिले आहेत. तसेच भारतानेही चीनलगतच्या समुद्रात संशोधनाचे निमित्त करीत चीनला आव्हान दिल्याने बदललेल्या पाश्र्वभूमीवर या लष्करी सरावाला महत्त्व आले आहे.

 

 

जे-११ आणि जे-१० या अद्ययावत लढाऊ विमानांचाही या सरावात सहभाग होता. सरावात एक पाच हजार मीटर उंचीच्या डोंगरावर पूर्ण कब्जा मिळविण्याची कारवाईची रंगीत तालीम घेण्यात आली. चीनचे हवाई दल आणि लष्कराने ही संयुक्त कारवाई पार पाडल्याचे चीनच्या संरक्षण खात्यानेच जाहीर केले आहे.