धर्मगुरू दलाई लामांच्या सुरक्षेत वाढ

तिबेटीईन धर्मगुरू दलाई लामा यांना जीवे मारण्याच्या कटानंतर दलाई लामा यांची सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दलाई लामा यांनी नुकतीच चीनने एका महिलेला त्यांच्या भाविकेच्या रुपात पाठवून जीवे मारण्याचा कट आखल्याचा सुतोवाच केला होता. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

Updated: May 16, 2012, 11:44 AM IST

www.24taas.com, काठमांडू

तिबेटीईन धर्मगुरू दलाई लामा यांना जीवे मारण्याच्या कटानंतर दलाई लामा यांची सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दलाई लामा यांनी नुकतीच चीनने एका महिलेला त्यांच्या भाविकेच्या रुपात पाठवून जीवे मारण्याचा कट आखल्याचा सुतोवाच केला होता. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

चिनी एजंट आपल्याला जीवे मारण्यासाठी काही तिबेटमधील महिलांना प्रशिक्षित करत असल्याचा आरोप,  दलाई लामा यांनी केला होता. धर्मशाळा येथील दलाई लामा यांच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना त्यांचे खासगी सचिव चिम्मी चोएकाप्पा यांनी सांगितले, की दलाई लामा यांना त्यांच्यावर होणाऱ्या हल्ल्याविषयी माहिती मिळाली आहे.

दलाई लामा यांनी  ब्रिटनमधील 'संडे टेलिग्राफ'ला सांगितले , तिबेटमधून आपल्याला अशी माहिती मिळाली आहे की चिनी एजंट विष खायला घालून जीवे मारण्याचा कट रचत आहेत. या कामात ते तिबेटमधील महिलांचा वापर करून घेणार आहेत. भारत सरकारच्या सुरक्षा अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून सध्या मी एक सुरक्षित मंदिरात राहत आहे. तेथे सतत सुरक्षेची चाचणी करण्यात येते.