बस अपघातात २२ विद्यार्थी ठार

बेल्जियन येथील बस अपघातात २२ ठार तर २४ जण जखमी झाले आहेत. विद्यार्थ्यांना घेऊन तीन बस जात होत्या. यातील एक बस स्विस बोगद्यातील भिंतीवर जोरदार धडकली. या अपघातात २२ विद्यार्थी चिरडले गेले. अपघाताच्यावेळी विद्यार्थ्यांच्या किंचाळ्यांनी परीसर हादरून गेला.

Updated: Mar 14, 2012, 05:53 PM IST

www.24taas.com,  जिनिव्हा 

बेल्जियन येथील बस अपघातात २२ ठार तर २४ जण जखमी झाले आहेत. विद्यार्थ्यांना घेऊन तीन बस जात होत्या. यातील एक बस  स्विस बोगद्यातील भिंतीवर जोरदार धडकली. या अपघातात २२  विद्यार्थी चिरडले गेले. अपघाताच्यावेळी  विद्यार्थ्यांच्या  किंचाळ्यांनी परीसर हादरून गेला.

बर्फावरून घसरण्याचा खेळ खेळण्यासाठी  मिळालेली सुट्टी संपल्याने ५२ विद्यार्थ्यांना घेऊन ही बस निघाली होती. विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली बस स्विस बोगद्यातील भिंतीवर आदळल्याने मंगळवारी रात्री हा अपघातात झाला. जखमी तसेत मृत विद्यार्थी हे १२ वर्षे वयोगटातील आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे, असे बेल्जियनचे परराष्ट्रमंत्री दिडियर रेंडर्स यांनी सांगितले.

जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती वालाईस कॅंटोनल राज्याचे पोलिस प्रवक्ते जिन मारी बोर्नेट यांनी दिली. हा दिवस बेल्जियन नागरिकांसाठी सर्वांत काळा दिवस असल्याचे बेल्जियनचे पंतप्रधान एलिओ दी रुपो यांनी सांगितले. दि रुपो अपघातग्रस्त विद्यार्थ्यांच्या पालकांना भेटण्यासाठी स्वित्झर्लंडला रवाना झाले आहेत.