मेक्‍सिकोत शीर नसलेले ४९ मृतदेह रस्त्यावर!

मेक्सिकन पोलिसांना आज ४९ जणांचे शीर नसलेले मृतदेह महामार्गावर आढळून आले आहेत. ड्रग्स घेतल्यानंतर झालेल्या जबरदस्त हिंसाचारानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृतांमध्ये ४३ पुरुष आणि सहा महिला असल्याचे मॅक्सिकोच्या पोलिसांनी सांगितले.

Updated: May 14, 2012, 11:14 PM IST

www.24taas.com, माँटेर्रे

मेक्सिकन पोलिसांना आज ४९ जणांचे शीर नसलेले मृतदेह महामार्गावर आढळून आले आहेत. ड्रग्स घेतल्यानंतर झालेल्या जबरदस्त हिंसाचारानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  मृतांमध्ये ४३ पुरुष आणि सहा महिला असल्याचे मॅक्सिकोच्या पोलिसांनी सांगितले.
मॅक्सिकोच्या अमेरिकेच्या सीमेवरील महामार्गावर प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये हे मृतदेह आढळले आहेत. मृतांचे शीर व हात तोडलेले असून, ते विवस्त्र अवस्थेत सापडले आहेत.

 

ड्रग्स घेतल्यानंतर ४९ जणांची कत्तल करून त्यांचे मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आले आहेत. त्यांची ओळख पटू नये म्हणून, शीराबरोबरच हातही तोडण्यात आले आहेत. त्यांची डीएनए तपासणी करण्यात येणार आहे.

 

दरम्यान, एका दहशतवादी संघटनेने हत्या केल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या व्यक्तींचे शीर व हात शोधण्याची मोहीम पोलिसांनी सुरू केली आहे.

Tags: