रशियात भव्यदिव्य कृष्ण मंदिराची उभारणी

रशियातील सायबेरियन प्रांतातील तोम्स्क शहरात भगवद गितेवरील बंदीच्या विरोधात हिंदु आणि कृष्ण भक्त न्यायालयीन लढाई लढत असताना मॉस्कोत कृष्णाचे भव्य दिव्य मंदिर उभाण्याचे काम चालु आहे. इस्कॉनचे गेली चाळीस वर्षे रशियात मंदिर उभारण्याचे स्वप्न पूर्णत्वास येत आहे.

Updated: Dec 25, 2011, 05:31 PM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

रशियातील सायबेरियन प्रांतातील तोम्स्क शहरात भगवद गितेवरील बंदीच्या विरोधात हिंदु आणि कृष्ण भक्त न्यायालयीन लढाई लढत असताना मॉस्कोत कृष्णाचे भव्य दिव्य मंदिर उभाण्याचे काम चालु आहे.  इस्कॉनचे गेली चाळीस वर्षे रशियात मंदिर उभारण्याचे स्वप्न पूर्णत्वास येत आहे.

मॉस्को वेदिक सेंटर या नावाने कृष्णाचे मंदिर उभारण्यात येत असल्याचं भारत भेटीवर आलेले इस्कॉनचे भक्ती विजिनाना गोस्वामींनी सांगितलं. रशियातील इंटरनॅशल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेसचे केंद्र असलेल्या मुळ कृष्ण मंदिराला पर्याय म्हणून बांधण्यात येत आहे. इस्कॉनचे जाळे रशियातील ८० शहरांमध्ये विस्तारलं असून जवळपास ५०,००० हून अधिक सक्रिय भक्तगण संप्रदायात सहभागी झाले आहेत.

मुळ कृष्णाचे मंदिर २००४ साली मॉस्को शहर प्रशासनाने नव्या अपार्टमेंटच्या उभारणीत अडसर ठरत होतं म्हणून पाडलं होतं. मॉस्को शहर प्रशासनाने भरपाई म्हणून इसकॉनला लेनिनग्राडस्काय ऍवेन्यूमध्ये पर्यायी जागा उपलब्ध करुन दिली होती तिथे सध्या मंदिर तात्पुरत्या स्वरुपात आहे. आता २०१२ सालच्या अखेरीस ते कायमस्वरुपी मॉस्को वेदिक सेंटर इथे स्थालंतरित होईल. रशियाच्या राजधानीत आम्ही केलेल्या मानवतावादी सेवेची दखल घेत असताना दुसऱ्या शहरात भगवद् गितेवर बंदी घालण्यात येत असल्याची घटना दुर्दैवी आहे असं साधु प्रिया दास यांनी म्हटलं आहे.