First Look: 'बाजीराव मस्तानी'मधील रणवीर, दीपिका आणि प्रियंकाचा फर्स्ट लूक

बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'बाजीराव-मस्तानी'चा फर्स्ट लूक लॉन्च झालाय. 'बाजीराव-मस्तानी'मध्ये दीपिका पादुकोण, प्रियंका चोपडा, रणवीर सिंह प्रमुख भूमिकेत आहेत.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jul 15, 2015, 11:42 AM IST
First Look: 'बाजीराव मस्तानी'मधील रणवीर, दीपिका आणि प्रियंकाचा फर्स्ट लूक

मुंबई: बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'बाजीराव-मस्तानी'चा फर्स्ट लूक लॉन्च झालाय. 'बाजीराव-मस्तानी'मध्ये दीपिका पादुकोण, प्रियंका चोपडा, रणवीर सिंह प्रमुख भूमिकेत आहेत.

'बाजीराव-मस्तानी'चे प्रोड्यूसर इरोज नाऊनं आज सोशल साइटवर तिन्ही अॅक्टर्सचा लूक प्रसिद्ध केलाय. 

चित्रपटात रणवीर सिंह मराठा योद्धा बाजीराव पेशवे यांच्या भूमिकेत आहे. 

अभिनेत्री दीपिका पदुकोण बाजीरावची दुसरी पत्नी मस्तानीच्या भूमिकेत दिसणार आहे. 

तर प्रियंका चोपडा बाजीराव पेशव्यांची पहिली पत्नी काशीबाईच्या रुपात दिसेल.

यापूर्वी या तिघांनी भंसाळी यांच्याच 'गोलियों की रासलीला-रामलीला'मध्ये एकत्र काम केलंय. चित्रपटाचा टिझर गुरूवारी रिलीज होणार आहे. तसंच ईदला रिलीज होणाऱ्या सलमानच्या 'बजरंगी भाईजान' सोबत चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होईल.

१८ डिसेंबरला बाजीराव-मस्तानी रिलीज होणार आहे. याच दिवशी शाहरूख खानचा 'दिलवाले' पण रिलीज होणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.