मुंबई : अनेकांना काहीना काही तरी वाईट गोष्टींची सवय असतेच. बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांना काहीना काही तरी वाईट गोष्टींची सवय आहे. अनेक प्रयत्नांनतरही त्यांनी ती सवय सोडता आलेली नाही.
वाईट सवय असलेले कलाकार :
१. जॉन अब्राहिम : जॉनला खूप वेगात गाडी चालवण्याची वाईट सवय होती पण एका अपघातानंतर त्याने ही सवय सोडली असली तरी त्याला एका अशा गोष्टींची सवय आहे ज्यामुळे शुंटींग दरम्यान एक शॉट त्यांना ३ ते ४ वेळा घ्यावा लागतो. जॉनला सतत पाय हलवण्याची सवय आहे.
२. शाहरुख खान : शाहरुख खानला सिगरेट पिण्याची वाईट सवय आहेच पण त्यासोबतच त्याला नेहमी सूट-बुटमध्ये राहण्याची सवय आहे. शाहरुख पायातले बुटं कधीच काढत नाही. त्याला जर झोपतांना पायातील बुट काढण्याची परवानगी मिळाली तर तो बुट घालूनही झोपत जाईल.
३. सुष्मिता सेन : सुष्मिता सेनला सिगरेट आणि दारु पिण्याची वाईट सवय आहे पण त्यासोबतच तिला बाथरुममध्ये अंघोळ करणं आवडत नाही. तिला छप्पर नसलेल्या ठिकाणी अंघोळ करायला आवडतं. त्यासाठी तिने घरावर तशी सोय ही केली आहे. ती मोकळ्या आकाशाखाली अंघोळ करायला आवडतं.
४. शाहिद कपूर : शाहिदला सिगरेट पिण्याची जास्त सवय नसली तरी मात्र तो कॉफीपासून दूर राहू शकत नाही. कॉफी न मिळाल्यास त्याला अस्वस्थ वाटू लागतं.
५. जितेंद्र : जंपिंग जॅक जिंतेंद्रला बाथरुममध्ये असतांनाही खाण्याही सवय आहे. बाथरुममध्ये जातांना ते सोबत काहीतरी खायला घेऊन जातात.