मुंबई : अभिनेता जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा हिचे टॉपलेस फोटो सध्या सोशल वेबसाईटवर वायरल झालेत. या फोटोंवर प्रतिक्रिया देताना जॅकी श्रॉफ बचावात्मक पवित्रा घेताना दिसला.
कृष्णा श्रॉफ हिनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आपले काही टॉपलेस फोटो शेअर केलेत. हे फोटो काही वेळातच वायरल झाले. याच फोटोंवर 'डीएनए'नं जॅकी श्रॉफला त्याची प्रतिक्रिया विचारली.
यावर, 'मला माझ्या मुलांच्या खाजगी जीवनात ढवळाढवळ करणं आवडत नाही. कृष्णा आणि टायगर या दोघांनाही आपलं चांगलं - वाईट चांगलंच कळतं. आपल्या काही गोष्टींवर ते जास्त चांगल्या पद्धतीनं स्पष्टीकरण देऊ शकतात. ते जे काही करतात त्यात मीदेखील कन्फर्टेब आहे' असं जॅकीनं पहिल्यांदा म्हटलं.
अधिक वाचा - जॅकी श्राफची मुलगी कृष्णाचे टॉपलेस फोटो व्हायरल
त्यानंतर मात्र तो थोडा डिफेन्स करताना दिसला. 'कृष्णाचे जे फोटो तुम्ही पाहताय ते टॉपलेस नाहीत... हे पहिल्यांदा मी तुम्हाला सांगू इच्छितो... तिनं स्वत: भोवती टॉवेल गुंडाळलाय. टॉपलेस म्हणजे तुम्हीही काहीही परिधान केलेलं नसणं... मग, तुम्ही या फोटोंना टॉपलेस कसं म्हणू शकता' असं उत्तर यावर जॅकीनं दिलं.
टायगरप्रमाणेच कृष्णानंही बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली तर मला काहीच हरकत नाही... पण, अजूनपर्यंत तरी तीनं माझ्याकडे अभिनयाबाबत इच्छा व्यक्त केलेली नाही, असंही जॅकीनं स्पष्ट केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.