'ऐ दिल है मुश्किल'च्या रिलीजचा वाद दिल्ली दरबारी

'ऐ दिल है मुश्किलच्या रिलीज वरून निर्माण झालेला वाद आज दिल्ली दरबारी पोहचलाय. 

Updated: Oct 20, 2016, 02:47 PM IST
'ऐ दिल है मुश्किल'च्या रिलीजचा वाद दिल्ली दरबारी title=

नवी दिल्ली : 'ऐ दिल है मुश्किलच्या रिलीज वरून निर्माण झालेला वाद आज दिल्ली दरबारी पोहचलाय. 

चित्रपटाची निर्मिती संस्था धर्मा प्रॉडक्शनच्या वतीनं अपूर्व मेहता आणि फॉक्स स्टार्सचे विजय सिंग आणि प्रोड्युसर्स गिल्डचे मुकेश भट्ट यांनी आज गृहमंत्री राजनाथ सिंहांची भेट घेतली.  

मनसेनं इशारा दिलेला असला, तरी सरकार आमच्या पाठिशी आहे त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही, असं या बैठकीनंतर मुकेश भट्ट यांनी म्हटलंय. शिवाय गृहमंत्र्यांनी पूर्ण सुरक्षेचं आश्वासनही दिल्याचं भट्ट म्हणाले. 

प्रोड्युसर्स गिल्डनं सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निर्देश देण्याची मागणी केलीय. या बैठकीत केंद्रीय राज्य मंत्री बाबुल सुप्रियो सुद्धा उपस्थित होते. बैठकीनंतर बोलताना बाबुल सुप्रियोंनी मनसे हा गुंडांचा पक्ष असल्याचं म्हटलंय.