व्हिडीओ | परदेशी बाबूंवर 'रहमानीया'ची जादू

बेरक्ली कॉलेज ऑफ म्यूझिकच्या विद्यार्थ्यांवर ए आर रहमान यांच्या संगीताचा असा काही रहमानीया चढला आहे की, त्यांनी ए आर रहमान यांचं 'दिल से रे' हे गाणं अनोख्या ढंगात गायलं मात्र संगीताचा बाज कायम ठेवला.

Updated: Oct 29, 2015, 10:17 PM IST
व्हिडीओ | परदेशी बाबूंवर 'रहमानीया'ची जादू title=

मुंबई : बेरक्ली कॉलेज ऑफ म्यूझिकच्या विद्यार्थ्यांवर ए आर रहमान यांच्या संगीताचा असा काही रहमानीया चढला आहे की, त्यांनी ए आर रहमान यांचं 'दिल से रे' हे गाणं अनोख्या ढंगात गायलं मात्र संगीताचा बाज कायम ठेवला.

व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली

विशेष म्हणजे या गाण्यात हिंदी न येणारे जगातील सर्वच विद्यार्थ्यांचा समावेश होता, अगदी युरोपपासून आफ्रिकेपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी दिल से रे गायलंय. या म्यूझिक कॉलेजने आतापर्यंत जी गाणी गायली आहेत ती, सर्वात जास्त ए आर रहमान यांचीच आहेत. 

रहमान यांचं या विद्यार्थ्यांनी गायलेलं हे गाणं ऐकण्यात एक वेगळा आनंद आहे, ऐकून तर पाहा, 'दिल से रे'

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.