आमिरनं महाराष्ट्रातील दोन दुष्काळग्रस्त गावं घेतली दत्तक

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खाननं दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी एक स्तुत्य उपक्रम हाती घेतलाय.

Updated: Apr 19, 2016, 01:37 PM IST
आमिरनं महाराष्ट्रातील दोन दुष्काळग्रस्त गावं घेतली दत्तक title=

मुंबई : बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खाननं दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी एक स्तुत्य उपक्रम हाती घेतलाय.

महाराष्ट्र सरकारसोबत हात मिळवणी करत आमिर खाननं महाराष्ट्रातील दोन दुष्काळग्रस्त गावं दत्तक घेतली आहेत. 

महाराष्ट्रातले ताल आणि कोरेगाव ही दोन गावं आमिरनं दत्तक घेतलीत. सध्या आमिर महाराष्ट्राच्या काही दुष्काळग्रस्त गावांच्या दौऱ्यावर आहे. इथं जाऊन तो गावकऱ्यांना पाणी बचतीचे काही सल्लेही देतोय. 

नुकतीच आमिरनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सत्यमेव जयते वॉटर कप - एक जल व्यवस्थापन आणि विकेंद्रीकरण स्पर्धा लॉन्च केली होती. 

याअगोदर त्यानं गुजरात राज्यातील भुजजवळचं एक गावं दत्तक घेतलं होतं. २००१ साली झालेल्या भूकंपाच्या धक्क्यात हे गाव उद्ध्वस्त झालं होतं.