'दंगल'साठी आमीरने चोरली मराठी चित्रपटाची थीम?

मिस्टर परफेक्ट आमीर खानचा बहुचर्चित सिनेमा 'दंगल'चं पोस्टर आज रिलीज करण्यात आलं आहे. आमीर खान हा काहीतरी वेगळा प्रयोग करण्यासाठी ओळखला जातो. मात्र आमीर खानने 'दंगल'च्या पोस्टरसाठी, मराठी सिनेमा 'ख्वाडा'ची थीम चोरली की काय? असा प्रश्न तुम्हाला निश्चित पडेल. 

Updated: Sep 21, 2015, 06:25 PM IST
'दंगल'साठी आमीरने चोरली मराठी चित्रपटाची थीम? title=

मुंबई : मिस्टर परफेक्ट आमीर खानचा बहुचर्चित सिनेमा 'दंगल'चं पोस्टर आज रिलीज करण्यात आलं आहे. आमीर खान हा काहीतरी वेगळा प्रयोग करण्यासाठी ओळखला जातो. मात्र आमीर खानने 'दंगल'च्या पोस्टरसाठी, मराठी सिनेमा 'ख्वाडा'ची थीम चोरली की काय? असा प्रश्न तुम्हाला निश्चित पडेल. 

आमीरचा दंगल आणि मराठी चित्रपट 'ख्वाडा'चं पोस्टर सारखं
कारण काही दिवसांपूर्वीच ख्वाडा चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊ कऱ्हाडे यांनी ख्वाडाचं पोस्टर रिलीज केलं होतं. या पोस्टरशी साधर्म्य असलेलं पोस्टर आमीर खानच्या दंगल सिनेमाचं आहे.

पैसे नव्हते, म्हणून जमीन विकून चित्रपट काढला
भाऊ कऱ्हाडे यांचा 'ख्वाडा' हा मराठी सिनेमा, २२ ऑक्टोबर रोजी रिलीज होतोय. ‘माझ्या या सिनेमाने आपल्याला चांगले दिवस येतील,’ असा विश्वास भाऊराव कऱ्हाडे यांनी कुटुंबीयांना दिला, आणि ख्वाडा चित्रपटासाठी भाऊ कऱ्हाडे यांनी आपली जमीन विकली, ८० ते ९५ लाखात 'ख्वाडा' निर्मिती केली आहे.

'ख्वाडा'ला दोन राष्ट्रीय पुरस्कार
‘ख्वाडा’ चित्रपटाला विशेष परीक्षक पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी असे दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. नेहमीच स्थलांतरित जीवन जगणाऱ्या एका धनगर कुटुंबाची वास्तवदर्शी कथा ‘ख्वाडा’ मध्ये चित्रित करण्यात आली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.