'दंगल' सिनेमातील आमीर खानचा 'फर्स्ट लूक'

आमीर खानच्या दंगल सिनेमातील फर्स्ट लूक सर्वांसमोर आला आहे. आमीर खान सिनेमात नवा प्रयोग करण्यासाठी ओळखला जातो. दंगलच्या या नव्या पोस्टरवर आज से दंगल शुरू असं लिहलं आहे.

Updated: Sep 21, 2015, 05:40 PM IST
'दंगल' सिनेमातील आमीर खानचा 'फर्स्ट लूक' title=

मुंबई : आमीर खानच्या दंगल सिनेमातील फर्स्ट लूक सर्वांसमोर आला आहे. आमीर खान सिनेमात नवा प्रयोग करण्यासाठी ओळखला जातो. दंगलच्या या नव्या पोस्टरवर आज से दंगल शुरू असं लिहलं आहे.

चिखलात माखलेला आमीर खानचा चेहरा या पोस्टरवर दाखवण्यात आला आहे, आमीर खानेन या सिनेमासाठी वजनही वाढवलं आहे. आमीर खानचा सिनेमा महावीर फोगट आणि त्यांच्या मुलींवर आधारीत आहे. आमीर खान या सिनेमात महावीर पहेलवानची भूमिका साकारतोय. या सिनेमाचं शुटिंग पंजाबमध्ये सुरू आहे.

या सिनेमाचं शुटिंग पंजाब आणि हरियाणात दोन महिने चालणार आहे. ख्रिसमसच्या मुहुर्तावर हा सिनेमा रिलीज होण्याची शक्यता आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.