ABCD 2 : पहिल्याचं दिवशी १४ कोटी रूपये कमाई करणारा सिनेमा

ABCD-2 या सिनेमाने वर्षभरातले कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. या सिनेमाला निर्मितीसाठी ५५ कोटी रूपये खर्च करण्यात आला आहे, तर ओपनिंगच्या दिवशीच गल्ला १४.३ कोटींवर गेला आहे. गब्बर इज बॅकने ओपनिंगला १३.३ कोटी रूपये कमाई केली होती.

Updated: Jun 21, 2015, 11:15 PM IST
ABCD 2 : पहिल्याचं दिवशी १४ कोटी रूपये कमाई करणारा सिनेमा title=

मुंबई : ABCD-2 या सिनेमाने वर्षभरातले कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. या सिनेमाला निर्मितीसाठी ५५ कोटी रूपये खर्च करण्यात आला आहे, तर ओपनिंगच्या दिवशीच गल्ला १४.३ कोटींवर गेला आहे. गब्बर इज बॅकने ओपनिंगला १३.३ कोटी रूपये कमाई केली होती.

 ABCD-2 सिनेमाचं तब्बल २ हजार ठिकाणी स्क्रिनिंग सुरू आहे, त्यातील ५०० थिएटर्समध्ये तो थ्रीडीमध्ये दाखवण्यात येतोय. हा सिनेमा देशातील सर्वात मोठा थ्रीडी रिलीज सिनेमा आहे.

अभिनेता वरूण धवन आणि श्रद्धा कपूर यांच्या एबीसीडी-२ या सिनेमाने पहिल्याच दिवशी छप्पर फाडके कमाई केली आहे. 'डान्स'वर आधारित असलेल्या या सिनेमाला चाहत्यांनी भरभरून पसंती दिल्याचं पाहायलं मिळतं. या सिनेमाचं रविवारचं अॅडव्हान्स बुकिंग पाहता, ओपनिंग विकेंडमध्ये या सिनेमाची कमाई ५० कोटींच्या पुढे जाईल, असा अंदाज तरन आदर्श यांनी व्यक्त केला आहे. 

शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसात या सिनेमाने २९ कोटी ३० लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे. महत्त्वाचं म्हणजे पहिल्याच दिवशी या सिनेमाने १४ कोटी ३० लाख रुपयांची कमाई केली. या वर्षात 'ओपनिंग डे' ला इतकी कमाई करणार, हा पहिलाच सिनेमा ठरला आहे.

चित्रपट समीक्षक आणि ट्रेड अॅनालिस्ट तरन आदर्श यांनी ट्विटरवर याबाबतची माहिती दिली आहे. यापूर्वी नुकत्याच येऊन गेलेल्या अक्षय कुमारच्या 'गब्बर इज बॅक' या सिनेमाने दोन दिवसात २४.५५ कोटी रुपये जमवले होते. मात्र आता ABCD 2 ने त्याच्या पुढे मजल मारली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.