कोरिओग्राफर फराह खानचं हे रुप तुम्ही पाहिलंय?

अभिनेता अभिषेक बच्चननं कोरिओग्राफर आणि आपला आगामी सिनेमा ‘हॅपी न्यू इअर’ची डायरेक्टर फराह खान हिचं एक नवं (खरं तर जुनं) रुप लोकांसमोर आणलंय.

Updated: Aug 5, 2014, 10:10 AM IST
कोरिओग्राफर फराह खानचं हे रुप तुम्ही पाहिलंय? title=

मुंबई : अभिनेता अभिषेक बच्चननं कोरिओग्राफर आणि आपला आगामी सिनेमा ‘हॅपी न्यू इअर’ची डायरेक्टर फराह खान हिचं एक नवं (खरं तर जुनं) रुप लोकांसमोर आणलंय.

अभिषेकनं 1987 मध्ये जावेफ जाफरीच्या ‘सात साल बाद’ या सिनेमातील एक डान्स व्हिडिओ सोशल वेबसाईट ट्विटरवर पोस्ट केलाय... या व्हिडिओमध्ये जावेदसोबत जी मुलगी डान्स करताना दिसतेय ती दुसरी-तिसरी कुणी नसून फराह खान आहे...

तुम्ही, या सिनेमातील क्रेडीट रोलमध्ये सर्च कराल तर तुम्हाला फराहचं नाव कुठेही दिसणार नाही. त्यावेळी, फराह खान कोरिओग्राफर म्हणून आपली ओळख बनविण्याची धडपड करत होती. तिच्या नावाचा उल्लेख करावा इतकं वलय तिच्या नावाला तेव्हा प्राप्तही झालं नव्हतं... पण, त्यानंतर मात्र कोरिओग्राफर, डायरेक्टर इतकंच काय तर अभिनेत्री म्हणूनही ती लोकांसमोर आली...

अभिषेकनं ट्विट करून फराहचा हा नवा अवतार लोकांसोबत शेअर केलाय. त्यावर, ‘तुम्ही खूप वाईट आहात... खूप खूप वाईट’ अशी प्रतिक्रिया फराहनं दिलीय. त्यावर, अभिषेकनं पुन्हा प्रतिक्रिया देत, ‘फराह... आम्हाला खरं सांग... तुला ‘हॅपी न्यू इअर’ची प्रेरणा इथूनचं मिळालीय ना...’  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.