नवी दिल्ली : करण जोहरनं 'स्टुडंट ऑफ द ईअर' या सिनेमातून आलिया भट्ट, वरूण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्राला लॉन्च केलं होतं. आता करण जोहर या सिनेमाचा सिक्वल बनवण्याच्या विचारात आहे. या नव्या सिनेमात करण आराध्या, अबराम, आणि आझादला घेण्याच्या विचारात आहे, तेही वीस वर्षांनंतर...
एका मुलाखती दरम्यान जेव्हा करणला विचारण्यात आलं की, जर २० वर्षांनंतर 'स्टुडंट ऑफ द ईयर'चा सिक्वल बनवायचा असेल तर आलिया, वरूण आणि सिद्धार्थची भूमिका कोण करेल? यावर बोलताना करणनं झटकन शाहरुखचा मुलगा अबराम, ऐश्वर्या-अभिषेकची मुलगी आराध्या आणि आमिरचा मुलगा आझाद यांची आपण या भूमिकेसाठी निवड करू असं उत्तर देऊन टाकलं...
आराध्या, अबराम आणि आझादला 'स्टुडंट ऑफ द ईअर'मधल्या आलिया, सिद्धार्थ आणि वरुणच्या भूमिकेत पाहणं नक्कीच मनोरंजक असेल पण हा सिनेमा प्रत्यक्षात येण्यासाठी या तिघांचंही मोठं होणं गरजेचं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.