इमरान हाशमीसोबत काम केलेली अभिनेत्री आली रस्त्यावर

आईना या चित्रपटामध्ये इमरान हाशमीसोबत काम केलेली अभिनेत्री अलीसावर रस्त्यावर यायची वेळ आली आहे.

Updated: Jun 10, 2016, 06:21 PM IST
इमरान हाशमीसोबत काम केलेली अभिनेत्री आली रस्त्यावर title=

मुंबई : आईना या चित्रपटामध्ये इमरान हाशमीसोबत काम केलेली अभिनेत्री अलीसावर रस्त्यावर यायची वेळ आली आहे. दिल्लीतल्या ग्रेटर कैलाश भागामध्ये अलीसा भटकताना आढळली आहे. 

हिंदी चित्रपट माय हसबंड्स वाईफ या चित्रपटामध्येही तिनं काम केलं होतं, पण घरातल्यांनी तिला बाहेर काढल्यामुळे तिच्यावर ही वेळ आली आहे. 

अलीशाचा एक्स बॉयफ्रेंडबरोबरचा तिचा एक व्हिडिओ लीक झाला होता. याप्रकरणी अलीशानं पोलिसांकडे तक्रारही दाखल केली आहे. आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात लढण्याचं अलीशानं ठरवलं, पण हे तिची आई आणि भावाला सहन झालं नाही, त्यामुळे तिला घराबाहेर काढण्यात आलं.