याकूबवरील ट्विट वादानंतर सलमानच्या 'बजरंगी'च्या कमाईत घट?

११९३च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी याकूब मेमनच्या बाजूनं ट्विटकरून वाद ओढवणं कदाचित सलमानच्या फॅन्सना आवडलेलं दिसत नाही. कारण बॉक्स ऑफिसवर सलग जबरदस्त कलेक्शन करणारा चित्रपट 'बजरंगी भाईजान'ची कमाई सोमवारी जरा कमी झालेली दिसली.

Updated: Jul 28, 2015, 10:10 PM IST
याकूबवरील ट्विट वादानंतर सलमानच्या 'बजरंगी'च्या कमाईत घट?

मुंबई: ११९३च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी याकूब मेमनच्या बाजूनं ट्विटकरून वाद ओढवणं कदाचित सलमानच्या फॅन्सना आवडलेलं दिसत नाही. कारण बॉक्स ऑफिसवर सलग जबरदस्त कलेक्शन करणारा चित्रपट 'बजरंगी भाईजान'ची कमाई सोमवारी जरा कमी झालेली दिसली.

चित्रपटानं शुक्रवारी १२ कोटी, शनिवारी १९ कोटी, रविवारी २४.०२ कोटींची कमाई केली. मात्र सोमवारी कमाई घसरत ती ९.३० कोटींवर आली. 

विकेंडच नव्हे आठवड्याच्या प्रत्येक दिवशी सलमानच्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलीय. देशात तब्बल २५० कोटींचा गल्ला 'बजरंगी भाईजान'नं जमवलाय. 

मात्र रविवारी सलमाननं याकूब मेमनच्या फाशीच्या शिक्षेबाबत ट्विट केलं. त्यानंतर वडील सलीम खान यांच्या रागवण्यानंतर त्यानं आपल्या ट्विटसाठी क्षमा मागितली. 

पण याचा परिणाम 'बजरंगी भाईजान'च्या कमाईवर होतोय का? असा विचार आकडे पाहून येतोय. सलमानच्या टि्वटनं अनेकांची मन दुखावली गेलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x