आमचा व्हिडिओ पाहण्याची सक्ती नाही, 'AIB'नं सोडलं मौन

अश्लिल विनोद, शेरेबाजी आणि टिप्पणीमुळं वादात सापडलेल्या एआयबी नॉकआऊट्स या शोनं पहिल्यांदाच या विषयावर भाष्य केलंय. 

Updated: Feb 5, 2015, 03:13 PM IST
आमचा व्हिडिओ पाहण्याची सक्ती नाही, 'AIB'नं सोडलं मौन title=

मुंबई: अश्लिल विनोद, शेरेबाजी आणि टिप्पणीमुळं वादात सापडलेल्या एआयबी नॉकआऊट्स या शोनं पहिल्यांदाच या विषयावर भाष्य केलं असून 'आमचा शो पाहण्याची कोणावरही सक्ती करण्यात आली नव्हती' असं स्पष्ट केलं आहे. एआयबीच्या फेसबूक आणि ट्विटर पेजवर एक निवेदन देण्यात आलं असून एअर टाईम विकत घेऊन कोणत्याही टीव्ही चॅनेलवर आम्ही हा शो प्रसारित केलेला नाही. 

यू-टूयबवर प्रसारित करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये वयोमर्यादेची सूचनाही स्पष्टपणे दिली होती, असंही त्यात नमूद करण्यात आलं आहे. एकीकडे एआयबीला विरोध असतानाही त्यांचे असंख्य समर्थक त्यांच्याबाजूने उभे राहिल्याबद्दल एआयबीनं त्यांचे आभार मानले आहेत. 

कार्यक्रमाच्या माध्यमातून काहीतरी नवीन आणण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो, हे आमच्या समर्थकांना माहीत आहे. एआयबी नॉकआऊटमध्येही आम्ही काहीतरी नवीन देण्याचा आणि सेलिब्रिटींना स्वत:वरच हसायला लावायचा प्रयत्न केला. कोणाचाही अपमान करण्याचा वा त्यांना दुखावण्याचा आमचा कोणताही उद्देश नव्हता. कार्यक्रमातील उपस्थितांनीही त्यांच्यावरील विनोदांना दाद देत ती संध्याकाळ हसत हसत घालवली,' असं निवेदनात म्हटलं आहे.

Hey everyone... pic.twitter.com/bBcnji3LBV

— All India Bakchod (@AllIndiaBakchod) February 4, 2015

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.