मुंबई : बॉलिवूडची 'क्वीन' कंगना रानौत हिची नजर आहे अनुष्का शर्माच्या बॉयफ्रेंडवर... हो, हे आम्ही नाही तर ती स्वत: म्हणतेय...
कंगना, अनुष्काचा बॉयफ्रेंड म्हणजेच विराट कोहलीची मोठी फॅन आहे.. नुकतंच तिला एका मुलाखती दरम्यान, सर्वात आवडता क्रिकेटर कोण? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिनं झटकन उत्तर दिलं, 'मला अनुष्काचा बॉयफ्रेंड आवडतो'...
अर्थात, तिनं विराटचाच उल्लेख केला होता. विराट कोहलीवर फिदा झालेली कंगना ही काही एकच व्यक्ती नाही... त्यामुळे, अनुष्का आता जरा सावधान...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.