'जज्बा'मधून ऐश्वर्याचं बॉलिवूडमध्ये कम बॅक

बॉलिवूडची फेव्हरेट मॉम ठरलेली ऐश्वर्या रॉय-बच्चन तब्बल 4 वर्षांनंतर सिनेमात कम बॅक करतेय. संजय गुप्ता दिग्दर्शित करत असलेला सिनेमा 'जज्बा' मध्ये ऐश्वर्या दिसणार आहे. 

Updated: Jul 8, 2014, 06:26 PM IST
'जज्बा'मधून ऐश्वर्याचं बॉलिवूडमध्ये कम बॅक title=
फाईल फोटो

नवी दिल्ली: बॉलिवूडची फेव्हरेट मॉम ठरलेली ऐश्वर्या रॉय-बच्चन तब्बल 4 वर्षांनंतर सिनेमात कम बॅक करतेय. संजय गुप्ता दिग्दर्शित करत असलेला सिनेमा 'जज्बा' मध्ये ऐश्वर्या दिसणार आहे. 

'शूटआऊट अॅट वडाळा'मधील दमदार भूमिकेनंतर आता जॉन अब्राहम ही ऐश्वर्यासोबत 'जज्बा'मध्ये रोल करताना दिसणार आहे. जॉन या फिल्ममध्ये गँगस्टर अबू सालेमची भूमिका करताना दिसणार आहे.
  
सूत्रांच्या माहितीनुसार, ऐश्वर्यासोबत काम करणार असल्यानं जॉन खूप खूशही आहे. तसंच या सिनेमात काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे. 

या सिनेमात जॉनचा जास्त रोल नसला तरी खूप महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. ऐश्वर्यानं चार वर्षांपूर्वी ऋतिक रोशनसोबत 'गुजारिश' सिनेमा केला होता. 

सिनेमासाठी बाकीची कास्ट अजून ठरली नाहीय. मात्र प्रेषकांना हॅंडसम हंक जॉन आणि ऐश्वर्याला सिल्व्हर स्क्रिन वर एकत्र बघण्याचा खूप चांगला अनुभव असेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.