ऐश्वर्याची मुलगी म्हणते, तू परत मम्माच्या भूमिकेत ये

सरबजीत या चित्रपटातीलऐश्वर्याच्या लूकची सध्या चांगलीच चर्चा रंगलीये. मात्र हा लूक कसा वाटला असा प्रश्न ऐश्वर्याने आराध्याला विचारला. 

Updated: May 12, 2016, 01:21 PM IST
ऐश्वर्याची मुलगी म्हणते, तू परत मम्माच्या भूमिकेत ये title=

मुंबई : सरबजीत या चित्रपटातील ऐश्वर्याच्या लूकची सध्या चांगलीच चर्चा रंगलीये. मात्र हा लूक कसा वाटला असा प्रश्न ऐश्वर्याने आराध्याला विचारला. 

या प्रश्नावर ऐश्वर्याच्या या लाडलीने प्रतिप्रश्न करत तू परत मम्माच्या भूमिकेत लवकर येशील ना असा भाबडा सवाल केला. 

आराध्याच्या या प्रश्नाने आपण खूपच भावूक झाल्याचं ऐश्वर्या सांगतेय.  कमबॅकनंतर ऐश्वर्याच्या या आणखी एका सिनेमाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यायेत.