मुंबई : उरी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर भारतातूनच प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. तसेच पाकिस्तानी कलाकारांवरील बंदीवरही मोठ्या चर्चा झडत आहेत यांना अक्षय कुमारने सणसणीत उत्तर एका व्हिडिओच्या माध्यमातून दिले आहे.
अक्षय म्हटला मी आज एक स्टार किंवा सेलिब्रिटी म्हणून बोलत नाही तर एका आर्मीवाल्याचा मुलगा म्हणून बोलत आहे. चॅनल आणि वर्तमानपत्रात चर्चा पाहत आहे. कोणी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागत आहेत. कोणी पाक कलाकारांना बॅन करण्याची मागणी करत आहे. कोणी म्हणतं की युद्ध होणार का.
अक्षय म्हणाला की पहिल्यांदा विचार करा की सीमेवर कोणी आपले प्राण दिले आहे. १९ जवान उरीमध्ये शहीद झाले, २४ वर्षांचा जवान नितिन यादव शहीद झाला. त्याच्या किंवा हजारो जवानांच्या कुटुंबियांना चित्रपट रिलीज होणार किंवा नाही किंवा कलाकारांवर बॅन लागला की नाही याची चिंता असेल का? जवान आहेत तर मी आहे, जवान आहेत तर आपण आहोत. ते नाही तर हिंदुस्तान नाही...
Something which has been on my mind since the past few days and I just had to say it. Not intending to offend anyone...so here goes pic.twitter.com/ASaLwobWgu
— Akshay Kumar (@akshaykumar) October 6, 2016