मुंबई : आज बॉक्स ऑफिसवर दोन बग बजेट सिनेमे प्रदर्शित होत आहेत. हिंदीमध्ये अक्षय कुमार स्टारर ब्रदर्स तर मराठीत अंकुश चौधरी मुक्ता बर्वेचा डबलसीट बॉक्स ऑफिसवर नशीब आजमाविण्यास सज्ज झाले आहेत.
२०११ साली आलेल्या हॉलिवूडच्या वॉरियर्स या सिनेमाचा ब्रदर्स रिमेक असून सिनेमात अक्षय कुमार, सिध्दार्थ मल्होत्रा, जॅकलिन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिनेमा मिक्स मार्शल आर्टसवर आधारित असून दोन भावांमधील संघर्षाची कहाणी सिनेमात दाखविण्यात आली आहे.
तर दुसरीकडे समीर विध्वंस दिग्दर्शित डबल सीट हा मराठी सिनेमाही बॉक्स ऑफिसवर झळकल आहे. सिनेमात अंकुश आणि मुक्ता बर्वे पहिल्यांदाच एकत्र काम करत असल्यामुळे सिनेमाकडून चांगल्याच अपेक्षा वाढल्या आहेत. स्वप्न बघणा-या आणि जगणा-या प्रत्येकाची गोष्ट सिनेमाव्दारे मांडण्यात आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.