स्वतंत्र भारताच्या पहिल्या 'ऑलिम्पिक गोल्ड'वर अक्षयचा नवा चित्रपट

बेबी, एअरलिफ्ट आणि रुस्तमनंतर अक्षय कुमार आणखी एक देशभक्तीपर चित्रपट घेऊन येतोय.

Updated: Oct 21, 2016, 09:41 PM IST
स्वतंत्र भारताच्या पहिल्या 'ऑलिम्पिक गोल्ड'वर अक्षयचा नवा चित्रपट  title=

मुंबई : बेबी, एअरलिफ्ट आणि रुस्तमनंतर अक्षय कुमार आणखी एक देशभक्तीपर चित्रपट घेऊन येतोय. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1948 मध्ये झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं मेडल मिळालं होतं. त्यावर अक्षयचा हा चित्रपट असणार आहे. गोल्ड असं या चित्रपटाचं नाव आहे. अक्षयनं ट्विट करून या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे.

15 ऑगस्ट 2018ला हा चित्रपट रिलीज होईल असंही अक्षयनं सांगितलं आहे. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या निर्मितीमध्ये हा चित्रपट बनणार आहे. अक्षयबरोबर या चित्रपटात कोण असणार याबाबतची उत्सुकता मात्र कायम आहे.

पाहा अक्षयच्या 'गोल्ड'चं पहिलं पोस्टर