'कॉमेडी नाईटस्'ची दादी जखमी

छोट्या पडद्यावर प्रत्येक शनिवारी आणि रविवारी दिसणारा कॉमेडी शो 'कॉमेडी नाईटस् विथ कपिल'मध्ये 'दादी'ची भूमिका निभावणारा कलाकार अली असगर सेटवर जखमी झालाय. 

Updated: Dec 5, 2014, 06:00 PM IST
'कॉमेडी नाईटस्'ची दादी जखमी title=

मुंबई : छोट्या पडद्यावर प्रत्येक शनिवारी आणि रविवारी दिसणारा कॉमेडी शो 'कॉमेडी नाईटस् विथ कपिल'मध्ये 'दादी'ची भूमिका निभावणारा कलाकार अली असगर सेटवर जखमी झालाय. 

शुटींग सुरु असताना एका सीनमध्ये तो सेटवरून खाली पडल्यानं त्याला दुखापत झालीय. पलकच्या आईची भूमिका निभावणाऱ्या किकू शारदा याच्यासोबत गंमतीदार फाईटिंग करताना हा प्रसंग ओढावला. 

त्याचं झालं असं की, एका सीनमध्ये किकू आणि अली शुटींग करताना मजेत भांडत होते त्याचवेळी दोघेही नवज्योत सिंह सिद्धूकडे जात असतानाच अलीचा पाय घसरला आणि तो प्रेक्षकांत खाली पडला. 

त्यामुळे अलीच्या मानेला आणि खांद्याला दुखापत झालीय. अलीच्या म्हणण्यानुसार, पडल्यानंतर त्याचं शरीर सुन्न झालं होतं आणि त्याला साधं हलताही येत नव्हतं. त्यामुळे, त्याला सेटवरच प्रथमोपचार द्यावे लागले... आणि नंतर तिथून हलवण्यात आलं. 

उल्लेखनीय म्हणजे, हा प्रकार घडला तेव्हा सेटवर 'दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे'चे १००० आठवडे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सेलिब्रेशन सुरू होतं. यावेळी शाहरुख खान, काजोल आणि त्यांची संपूर्ण टीम हजर होती. याच भागाच्या शुटींग दरम्यान ही घटना घडली. अलीला डॉक्टरांनी एक आठवड्यापर्यंत बेड रेस्ट करण्याचा सल्ला दिलाय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.