आलिया भट्ट झाली जखमी

काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की बॉलीवूडची चुलबुली अभिनेत्री आलिया भट्ट आजारी आहे. तिला अपेंडिसाइटीस आहे. तिचे वडील महेश भट्ट यांनी मीडियाला सांगितले होते की तिला खूप ताप आला आहे. 

Updated: Dec 31, 2014, 07:06 PM IST
आलिया भट्ट झाली जखमी title=

मुंबई : काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की बॉलीवूडची चुलबुली अभिनेत्री आलिया भट्ट आजारी आहे. तिला अपेंडिसाइटीस आहे. तिचे वडील महेश भट्ट यांनी मीडियाला सांगितले होते की तिला खूप ताप आला आहे. 

अपेंडिसाइटीसमुळे आलिया 'शानदार' या चित्रपटाचे शुटिंग मध्येच सोडावे लागले होते. पण आता आलिया भट्टच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. आलिया भट्ट जखमी झाली आहे. तिच्या करंगळीला जखम झाली आहे. 

आलियाला जीम करताना ही जखम झाली. आलियाने इंस्टाग्रामवर फोटो अपलोड करून आपल्या फॅन्सला ही माहिती दिली. फोटोमध्ये स्पष्ट दाखविण्यात आले की तिच्या करंगळीला जखम झाली आहे. 

अनुराग कश्पच्या अगलीच्या स्पेशल स्क्रिनिंगवेळीही ती जखमी झाली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.