व्हिडिओ : आलिया-शाहरुखची सहज-सोप्पी मैत्री 'लव्ह यू जिंदगी'

बॉलिवूड किंग शाहरुख खानला त्याच्या वाढदिवसानिमित्त आगामी सिनेमा 'डिअर जिंदगी'नं एक चांगलंच बर्थडे गिफ्ट दिलंय.

Updated: Nov 2, 2016, 10:26 PM IST
व्हिडिओ : आलिया-शाहरुखची सहज-सोप्पी मैत्री 'लव्ह यू जिंदगी'   title=

मुंबई : बॉलिवूड किंग शाहरुख खानला त्याच्या वाढदिवसानिमित्त आगामी सिनेमा 'डिअर जिंदगी'नं एक चांगलंच बर्थडे गिफ्ट दिलंय. या सिनेमाचं पहिला गाणं आज प्रदर्शित करण्यात आलंय. 

शाहरुख खान आणि आलिया भट्ट यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलंय. या गाण्याचे शब्द लिहिलेत कौसर मुनीरनं... तर संगीत दिलंय अमित त्रिवेदीनं... 

या सिनेमाची दिग्दर्शक आहे 'इंग्लिश विंग्लिश'फेम गौरी शिंदे... करण जोहरनं सोशल मीडियावर या गाण्याची लिंक शेअर केलीय. येत्या 25 नोव्हेंबर रोजी हा सिनेमा प्रेक्षकांसमोर येणार आहे. 

आलिया आदित्य रॉय कपूर, अली जफर, कुणाल कपूर आणि अंगद बेदी या चौघांसोबत या सिनेमात रोमान्स करताना दिसणार आहे.