'दंगल'साठी आमिरचं सरकारकडे साकडं...

या वर्षातील मच अवेटेड ‘दंगल’ हा सिनेमा टॅक्स फ्री करा, अशी मागणी परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानने केली आहे. 

Updated: Dec 22, 2016, 10:04 PM IST
'दंगल'साठी आमिरचं सरकारकडे साकडं... title=

मुंबई : या वर्षातील मच अवेटेड ‘दंगल’ हा सिनेमा टॅक्स फ्री करा, अशी मागणी परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानने केली आहे. 

कुस्तीला प्रोत्साहन मिळावं या उद्देशाने आमिरने सिनेमा टॅक्स फ्री व्हावा, असं म्हटलं आहे. सिनेमात आमीरने पैलवान महावीर सिंह फोगट यांची भूमिका साकारली आहे. त्याने ‘दंगल’ चित्रपटात तरुण आणि वृद्ध महावीर फोगट यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. 

या भूमिकेसाठी आमीरने सुरुवातीला त्याचं वजन सुमारे 90 किलोपर्यंत वाढवलं होतं. आमिरने या सिनेमासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे.

महावीर फोगट यांनी आपल्या दोन कन्या गीता आणि बबिता कुमारी यांना कशाप्रकारे प्रशिक्षण दिले, ही कथा मांडण्यात आली आहे.