ऑस्करच्या शर्यतीत या दोन भारतीय सिनेमांचा समावेश...

ऑस्करच्या घोडदौडीत जवळपास 336 फिचर फिल्मची रांग लागलीय. या सूचीत भारतीय बायोपिक असलेल्या एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी आणि सरबजीत या दोन सिनेमांचाही समावेश आहे. 

Updated: Dec 22, 2016, 09:24 PM IST
ऑस्करच्या शर्यतीत या दोन भारतीय सिनेमांचा समावेश... title=

लॉस एन्जेलिस : ऑस्करच्या घोडदौडीत जवळपास 336 फिचर फिल्मची रांग लागलीय. या सूचीत भारतीय बायोपिक असलेल्या एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी आणि सरबजीत या दोन सिनेमांचाही समावेश आहे. 

'एन्टरटेन्मेंट वीकली'नं दिलेल्या माहितीनुसार, 'अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस अॅन्ड सायन्स'नं बुधवारी सर्वश्रेष्ठ पिक्चर ऑस्करच्या यादीतील सिनेमांची एक यादीच जाहीर केलीय.

2016 च्या अॅकॅडमी पुरस्कारांच्या यादीत सहभागी होण्यासाठी सिनेमांना एक अटही आहे. जो सिनेमा लॉस एन्जेलिस काऊंटीच्या कमर्शिअल थिएटरमध्ये 1 जानेवारी ते 31 डिसेंबर दरम्यान सलग सात दिवसांपर्यंत दाखवली गेला असेल, तोच सिनेमा यासाठी पात्र ठरू शकतो. थिएटरमध्ये 35 एमएम किंवा 70 एमएम किंवा इतर योग्य डिजिटल फॉर्मेटमध्ये दाखवण्यात आलेल्या सिनेमाची लांबी 40 मिनिटांहून अधिक असायला हवी. 


एम एस धोनी - सरबजीत

सुशांत सिंह राजपूत तसंच रणदीप हुड्डा अभिनित सिनेमाशिवाय भारतीय अमेरिकन सिनेनिर्माता मीरा नायर यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या 'क्वीन ऑफ कात्वे' या सिनेमाचाही या यादीत समावेश झालाय. तसंच ला ला लँड, मूनलाईट, मॅनचेस्टर बाय द सी, सायलेन्स, अरायव्हल तसंच हॅकशॉ रिच हे या स्पर्धेतील मजबूत दावेदार सिनेमे मानले जात आहेत.