'मार्गारिटा विद अ स्ट्रॉ' एक साहसी सिनेमा - बीग बी

मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी कल्कि कोचलीन अभिनीत 'मार्गारिटा विद अ स्ट्रॉ'चं तोंडभरुन कौतुक केलंय. हा एक 'साहसी' सिनेमा असल्याचं त्यांनी म्हटलंय. 

Updated: Apr 11, 2015, 06:20 PM IST
'मार्गारिटा विद अ स्ट्रॉ' एक साहसी सिनेमा - बीग बी title=

नवी दिल्ली : मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी कल्कि कोचलीन अभिनीत 'मार्गारिटा विद अ स्ट्रॉ'चं तोंडभरुन कौतुक केलंय. हा एक 'साहसी' सिनेमा असल्याचं त्यांनी म्हटलंय. 
 
 शुक्रवारी या सिनेमाचं स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आलं होतं. या स्क्रिनिंगला अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन यांनीही हजेरी लावली. 
 
 यानंतर, ७२ वर्षीय बीग बींनी सोनाली बोस दिग्दर्शित या सिनेमाचं सोशल वेबसाईट ट्विटरवर कौतुक केलंय. 

'मार्गारिटा विद अ स्ट्रॉ'चं स्क्रिनिंग... मनात भरून राहणारा अभिनय आणि मूळ पटकथा असलेला एक साहसी सिनेमा' असं ट्विट पद्म विभूषण अमिताभ बच्चन यांनी केलंय. 

 

'मार्गारिटा विद अ स्ट्रॉ'चा ट्रेलर इथे पाहा...

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.