'गजनी'फेम असिन विवाहबंधनात अडकली?

'गजनी' या हिंदी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री असिन सध्या चर्चेत आलीय... सोशल मीडियामध्ये वधूच्या वेशात दिसणाऱ्या असिनबद्दल चर्चेला उधाण आलंय. 

Updated: Apr 11, 2015, 04:39 PM IST
'गजनी'फेम असिन विवाहबंधनात अडकली?

नवी दिल्ली : 'गजनी' या हिंदी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री असिन सध्या चर्चेत आलीय... सोशल मीडियामध्ये वधूच्या वेशात दिसणाऱ्या असिनबद्दल चर्चेला उधाण आलंय. 

या फोटोंमधे असिन वधूच्या वेशात, संपूर्ण हातभर मेहंदी आणि बांगड्या अशा वेशभूषेत दिसतेय... आणि तिचे हेच फोटो सध्या सोशल वेबसाईटवर फिरताना दिसतायत. यामुळे, असिन बोहल्यावर चढली असल्याची चर्चा सुरू आहे. 

परंतु, वास्तवात हे फोटो असिनच्या आगामी सिनेमातील एका सीनमधून घेण्यात आलेत. सध्या, असिन बिझी आहे ती तिच्या आगामी 'ऑल इज वेल' या चित्रपटाच्या शूटींगमध्ये... या सिनेमात एका सिनेमात ती वधू बनलीय. त्याच शूटींगमधून असिनचे हे फोटो लिक झालेत...

आमिर खानसोबत गजनी या सिनेमातून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणाऱ्या असिननं 'खिलाडी ७८६'मध्ये अक्षय कुमार तसंच 'रेडी' या सिनेमात सलमान खानसोबतही काम केलंय. यावेळी, ती ज्युनियर बच्चनसोबत म्हणजे अभिषेकसोबत दिसणार आहे.

'ऑल इज वेल' हा सिनेमा यावर्षी डिसेंबर महिन्यात प्रेक्षकांसमोर येण्याची शक्यता आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.