मुंबई : राज्यात वाघ वाचविण्याच्या मोहीमेसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. वाघ वाचवा, असा संदेश आता बिग बी अमिताभ बच्चन देणार आहेत. ते राज्याचे 'टायगर अॅम्बेसिडर' झाले आहेत.
टायगर सेव्ह या मोहिमेला राज सरकाराने पुढाकार घेतलाय. 'टायगर अॅम्बेसिडर' याबात एक प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावाला अमिताभ यांनी होकार दिला आहे. अमिताभ यापूर्वीच गुजरातचे अॅम्बेसिडर आहेत.
अमिताभ यांनी महाराष्ट्राचे व्याघ्रदूत म्हणजेच टायगर अॅम्बेसिडर व्हावे, अशी विनंती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २९ जुलैला केली होती. त्या विनंतीचा स्वीकार करत असल्याचे पत्र अमिताभ यांनी मुनगंटीवार यांना पाठविले आहे. नागपूरला व्याघ्र संरक्षण फाऊंडेशनच्या बैठकीत याबाबच चर्चा झाली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.